पाकच्या एफ-१६ विमानाच्या उडविल्या ठिकर्‍या ; देशभरात हाय अलर्ट ; श्रीनगर, लेह, लडाख, पठाणकोट, अमृतसर विमानतळावरून प्रवासी वाहतूक बंद

Foto
नवी दिल्‍ली । पुलवामा हल्ल्याचा भारतीय वायुदलाने मंगळवारी पाकमध्ये घुसून बदला घेतला. त्यामुळे चवताळलेल्या पाकच्या विमानाने आज भारतीय सियामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी भारतीय  सैन्यांनी प्रतिउत्तर दिले. त्यात पाकिस्तानचा एका फायटर विमानाच्या ठिकर्‍या उडविल्या. दरम्यान, युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊन भारत सरकारने जम्मू, श्रीनगर, लेह, लडाख, पठाणकोट, अमृतसर, चंदीगड येथील विमानतळावरून प्रवासी वाहतूक करण्यात मनाई केली आहे. आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेऊन देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री आणि संरक्षणमंत्र्यांनी लष्कर आणि अर्धसैनिक बलाच्या अधिकार्‍यांच्या बैठका घेतल्या आहेत.  

भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर आता पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचे समोर आले आहे. नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी विमानांनी घुसखोरी केली असून भारतीय हवाई दलाने या विमानांना पिटाळून लावले आहे. परतत असताना या विमानांनी भारतीय सैन्याच्या चौकीजवळ बॉम्ब फेकले असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हवाई दलाच्या मिराज-२००० या लढाऊ विमानांनी मंगळवारी पहाटे पाकिस्तानमधील बालाकोट येथे एअर स्ट्राइक केले होते. या एअर स्ट्राइकमध्ये ३५० दहशतवादी मारले गेले. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान हादरले असून भारताला योग्य वेळी प्रत्युत्तर देणार, असे पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले होते.

इम्रान खान यांच्या इशार्‍यानंतर बुधवारी सकाळी पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केली. हवाई दलाने प्रत्युत्तर देताच तिन्ही विमाने माघारी परतली, असे समजते. या विमानांनी भारतीय हद्दीत बॉम्बहल्ला केला. भारतीय सैन्याच्या चौकीजवळ त्यांनी बॉम्ब फेकले असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.पाकने घुसखोरी केल्याच्या घटनेनंतर श्रीनगर, लेह आणि पठाणकोट विमानतळांवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. या तिन्ही विमानतळांवरील विमान सेवा बंद करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव या विमानतळांवरील सेवा बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. डरपोक पाकड्यांचा डाव उधळला, जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानचं एफ-१६ विमान पाडलं भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानचं एफ-१६ हे विमान पाडल्याची माहिती समोर येत आहे. एएनआय वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे. आज सकाळी पाकिस्तानची तीन विमानं भारतीय हद्दील शिरल्यानंतर भारतीय वायुसेनेनं ही कारवाई केली आहे.

या घटनेनंतर सर्व विमानतळांवर हाय अलर्ट जारी केल्याची सूत्रांची माहिती आहे. काल भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर बिथरलेल्या पाकिस्तान आज सकाळी ही भारतीय हवाई हद्दीत प्रवेश केला होता. जम्मू काश्मीरच्या राजौरी परिसरात किमान तीन विमानं भारतीय हवाई हद्दीत आली असल्याची माहिती आहे. मात्र भारतीय वायुसेनेच्या चोख प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानच्या विमानांनी पळ काढला आहे. भारत सरकार किंवा वायुसेनेकडून याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही.

जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जवानांकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान
नवी दिल्ली । पुलवामा येथे भारतीय जवानांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा मंगळवारी भारतीय वायू सेनेनं बदला घेतला. वायू सेनेने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये ३५० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. याचदरम्यान काश्मीर खोर्‍यात भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी सुरु आहेत. काल रात्री काश्मीर खोर्‍यात दहशतवाद्यांविरोधात भारतीय सैन्याने मोठी कारवाई करत दोन दहशतवादी ठार केले आहेत. काल रात्री काश्मीरच्या शोपियामधील मेमरलॅन्ड भागात दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानंतर जवानांनी शोपियामध्ये सर्च ऑपरेशन राबवले. त्याचदरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला. त्यानंतर जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवादी ठार झाले आहेत. तसेच अजूनही एक दहशतवादी शोपियामध्ये लपला असल्याची माहिती लष्कराला मिळाली आहे. २४ फेब्रुवारीच्या रात्रीदेखील जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षाबलामध्ये चकमक झाली. या चकमकीत पोलीस उप अधीक्षक अमन ठाकूर शहीद झाले. तसेच या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला.
दरम्यान, भारताने काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा मंगळवारी बदला घेतला. भारतीय हवाई दलाने पाकच्या हद्दीत घुसून 350 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. 

या हल्ल्यानंतर पाकिस्तान बावचळला आहे. काल रात्रीपासून पाकिस्तानी जवान एलओसीवरील रहिवासी परिसरात लपून भारतावर ग्रेनेड हल्ले करत आहेत. पाकिस्तानच्या ग्रेनेड हल्ल्यात भारताचे ५ जवान जखमी झाले आहेत. या हल्ल्यांना भारतानेदेखील चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे काही रेंजर्स ठार झाले आहेत.

पाकिस्ताननेही केली विमान उड्डाणे रद्द 
पाकिस्तान सरकारनेही लाहोर, मुल्तान, सियालकोट, इस्लामाबाद, फैजाबाद या शहरातील विमानतळ बंद केली आहे. या विमानतळावरील सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली असून, वायुसेनेच्या वापरासाठी ही विमानतळे रिकामी करण्यात आली आहे.

चिकलठाणा विमानतळाची सुरक्षा कडेकोट
भारत- पाकिस्तान दरम्यान, वाढलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर देशातील सर्वच विमानतळांना हायअलर्ट देण्यात आला आहे. चिकलठाणा विमानतळावरही गेल्या दोन दिवसांपासून सुरक्षा वाढविण्यात आली आहे. सीआयएसएफचे 250 जवान विमान तळावर तैनात असल्याचे विमानतळ निर्देशक डी.जी. साळवे यांनी सांजवार्ताशी बोलताना सांगितले.

पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठक 
दरम्यान, पाकिस्तानच्या घुसखोरीनंतर देशाची तिन्ही सुरक्षा दले सज्ज झाली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी उच्च सुरक्षा विषयक बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण, गृहमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्‍लागार अजित डोभाल यांच्यासह गुप्‍तचर विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.